पुणे- बाजार समित्या बरखास्त करणे म्हणजे शेतकऱ्यांना अदानी, अंबानी, डीमार्ट यांच्या दारात उभे करण्यासारखे आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बाजार समित्या बरखास्त करण्याच्या वक्तव्याला विरोध केला आहे.
बाजार समित्या बरखास्त करणे हे शेतकऱ्यांना 'कॉर्पोरेट'च्या दारात उभे करण्याचा घाट - कॉर्पोरेट
बाजार समित्या बरखास्त करणे म्हणजे शेतकऱ्यांना अदानी, अंबानी, डीमार्ट यांच्या दारात उभे करण्यासारखे आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला विरोध केला आहे.
त्यामुळे जर याला पर्यायी व्यवस्था देणार नसाल तर स्वाभिमानी संघटना खपवून घेणार नाही, असा इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मुळात बाजार समिती बरखास्त करणे हा केंद्राचा विषय नसून राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समिती बरखास्त करणार, असे विधान केले होते. त्यावर स्वाभिमानीने टीका केली आहे.
हेही वाचा - पीकविम्याच्या पैशासाठी बीडच्या शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन, खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय जाणार नसल्याचा इशारा