महाराष्ट्र

maharashtra

'लालूंना तुरुंगात पाठवणारा अन् राम जन्मभूमीची केस जिंकणारा वकील मीच'

By

Published : Oct 13, 2019, 4:03 PM IST

पुण्यात वकिलांच्या संघटनेने आयोजित केलेल्या 'संवाद' या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांनी रवी शंकर प्रसाद यांची ओळख करून देताना ते कायदेमंत्री आहेत असे सांगितले. त्यानंतर बोलताना रवी शंकर म्हणाले, फक्त कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही, तर चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे.

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद

पुणे- लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. राम जन्मभूमीची केस जिंकणाराही वकील मीच आहे. मी स्वयंसेवक आहे आणि भाजपचा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्वतः ची ओळख करून दिली. पुण्यात वकिलांच्या संघटनेने आयोजित केलेल्या 'संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांनी रवी शंकर प्रसाद यांची ओळख करून देताना ते कायदेमंत्री आहेत असे सांगितले. त्यानंतर बोलताना रवी शंकर म्हणाले, फक्त कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही, तर चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे. परंतु माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

हेही वाचा - हिम्मत असेल तर ३७० अन् तिहेरी तलाक मागे घेऊन दाखवा, मोदींचे विरोधकांना आव्हान

राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कलम 370 चा एखादा तरी फायदा सांगावा कलम 370 मुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद फोफावला आहे. बेरोजगारी वाढली, महिला सुरक्षित नाहीत, काश्मीर खोऱ्याचा विकास रखडला आणि हेच कलम 370 आम्ही रद्द केले तर आमच्यावर टीका करत आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कलम 370 चा देशाला होणारा एखादा तरी फायदा सांगावा, असे आव्हान केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिले.

हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details