पुणे- महाराष्ट्रातील लोक देशभक्त नाहीत का? त्यांना जम्मू-काश्मीरची चिंता नाही का? महाराष्ट्र ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांची जन्मभूमी आहे. मग या प्रदेशातून 370 विषयी सवाल का उपस्थित होतात? कलम 370 हा निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला विचारला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते.
हेही वाचा -...आता फक्त शेती करून चालणार नाही, शेतीला व्यवसायासह नोकरीची जोड हवी - पवार
रवी शंकर म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर बंदुकीची एकही गोळी चालवावी लागली नाही. देशाचे 106 नियम तिथेही लागू करण्यात आले. हे कलम रद्द केल्याने महिलांना फायदा होणार आहे. यापूर्वी 42 हजार लोक मारले गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यासंदर्भात काँग्रेस का बोलत नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.