महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rasta Roko Agitation : किरकटवाडी खडकवासला येथे स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन

पुण्यातील किरकिवाडी-खडकवासला ( Kirkivadi-Khadakwasala ) शिव रस्त्याची गेल्या काही दिवसांत प्रचंड दुरवस्था झाली ( Bad condition of the road ) आहे. कालच्या पावसाने हा रस्ता पुन्हा खरवडून निघाल्याने तिथं मोठी ट्रँफिक जँम ( Traffic jam ) होतं आहे.

Rasta Roko Movement
रास्ता रोको आंदोलन

By

Published : Oct 16, 2022, 3:56 PM IST

पुणे - पुण्यातील किरकिवाडी-खडकवासला ( Kirkivadi-Khadakwasala ) शिव रस्त्याची गेल्या काही दिवसांत प्रचंड दुरवस्था झाली ( Bad condition of the road ) आहे. कालच्या पावसाने हा रस्ता पुन्हा खरवडून निघाल्याने तिथं मोठी ट्रँफिक जँम ( Traffic jam ) होतं आहे. पण प्रशासन रत्याकडे कानाडोळा करत असल्याने तिथल्या स्थानिक रहिवाशांचा आज संताप अनावर झाला आणि नागरिकांनी तब्बल अडीच तास तिथं रास्ता रोको आंदोलन ( Citizens Road Roko Andolan ) केलं. त्यामुळे वाहतुकीचा आणखीनच खोळंबा झालेला पाहायला मिळाला.

किरकटवाडी खडकवासला येथे स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन
स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन

स्थानिक नागरिकांकडून रास्ता रोको -कोल्हेवाडी भागात गेले अनेक वर्ष रस्त्याचं काम चालू आहे. परंतु सरकारतर्फे महानगरपालिकेतर्फे चाल ढकल चालू आहे प्रत्येक वेळी काहीतरी थातूरमातूर काम करायचं आणि वेळ मारून द्यायची त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप होत आहे. त्यामुळे आजची वाहतूक कोंडी पाहूया सहनशीलतेचा अंत झाला आहे. आज स्थानिक नागरिकांकडून हा रास्ता रोको केला जात आहे. प्रत्येक वेळी महानगरपालिका वेळ काढूपणा करीत असल्यामुळे आज नागरिकांना हे पाऊल उचलावे लागले आहे. प्रशासन हा रस्ता दुरूस्त करत नसल्यामुळेच आम्हाला हे आंदोलन करावं लागल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय.

खडकवासला येथे स्थानिकांचे रास्ता रोको आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details