पुणे -जिम ट्रेनर असलेल्या एका तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या खराडी परिसरात तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील एका जीममध्ये आरोपी दीपक चौगुले आणि पीडित तरुणी ट्रेनर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी दीपकने या तरुणीला कॉल करून भूक लागल्याचे सांगितले, तसेच तिला जेवणाचा डबा घेऊन जीममध्ये बोलावले. त्यानंतर दीपकने शितपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून, तिला प्यायला दिले. शितपेय पिल्यानंतर तरुणीला गुंगी आली. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.