पुणे - आळेफाटा येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढवून अश्लील फोटो, व्हिडिओ काढले. हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीच्यावर वारंवा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधीत व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निखिल पोटे (वय 20) विकी पोटे (वय 20 ) बंटी तितर (वय 20) दया टेमगिरे, यश गाडेकर अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नाव असून ते पिपरीपेढार, आळेफाटा येथील रहीवाशी आहेत.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, संशयीतांना पोलिसांनी घेतले ताब्यात - News of rape of a minor girl
आळेफाटा येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये निखिल पोटे (वय 20) विकी पोटे (वय 20 ) बंटी तितर (वय 20) दया टेमगिरे, यश गाडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व पिपरीपेढार, आळेफाटा येथील रहीवाशी आहेत.
आळेफाटा पोलीस स्टेशन
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
आळेफाटा येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रेमाच्या जाळ्यात ओढवून तीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. हे फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याच्या भीतीने त्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. या घटनेत पाच संशयीतांना अटक केली असून त्यांना खेड येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या व्यक्तींनी वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.