पिंपरी-चिंचवड -पुण्यातील हिंजवडीत झाऱ्याचे चटके देऊन 18 वर्षीय तरुणीवर ( Rape Attemt On 18 Year Old Girl ) बळजबरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूममध्ये कोणी नसताना अज्ञात तरुणांनी हे धाडस केल्याचं पोलीस उपयुक्त आनंद भोईटे यांनी माहिती दिली आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे.
Pune Girl Rape Attempt : झाऱ्याने चटके देत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, पिंपरी-चिंचवड येथील घटना; आरोपी फरार - पिंपरी चिंचवड मुलीचा विनयभंग
पुण्यातील हिंजवडीत झाऱ्याचे चटके देऊन 18 वर्षीय तरुणीवर ( Rape Attempt On 18 Year Old Girl ) बळजबरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Pune Girl Rape Attempt : झाऱ्याने चटके देत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, पिंपरी-चिंचवड येथील घटना; आरोपी फरार Pune Girl Molestation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14957139-thumbnail-3x2-pimp.jpeg)
झाऱ्याचा चटका देऊन विनयभंग -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुममध्ये मैत्रिणी नसताना अनोळखी तरुणाने पाण्याचा कॅन घेण्याचा बहना करून पीडितेच्या रुममध्ये प्रवेश करत तरुणीला मिठी मारली. तरुणीने प्रतिकार करण्यासाठी जवळच असलेल्या झाऱ्या फेकून मारला, तेव्हा बाहेर असलेल्या तरुणाला पहिल्या तरुणाने आत बोलवून पीडितेच्या पायावर बसून तोंड, हात दाबून धरले. पैकी एकाने सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. तरुणीने सिगारेटला झटका दिला अन खाली पाडली. चिडून तरुणाने, गॅसवर झाऱ्या गरम केला आणि पीडितेच्या डाव्या हातावर चटका देत तरुणीचे कपडे काढून विनयभंग केला. या घटनेमुळे तरुणीने भीतीच्या सावटाखाली आहे. हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.