पुणे : पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशन येथे बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत (Arrested in rape case) असलेल्या एका आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून स्वतःला जखमी करून (rape accused injured himself) घेतले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे देखील त्याने लघुशंकेसाठी जाण्याचा बहाणा करून काचेने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न (rape Accused in custody commits suicide) केला आहे. Latest news in Pune, Pune crime
Rape Accused Commits Suicide: बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - बलात्काराच्या गुन्ह्यात अटक
बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत (Arrested in rape case) असलेल्या एका आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून स्वतःला जखमी करून (rape accused injured himself) घेतले. आरोपीने रुग्णालयात लघुशंकेसाठी जाण्याचा बहाणा करून काचेने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न (rape Accused in custody commits suicide) केला आहे. Latest news in Pune, Pune crime
![Rape Accused Commits Suicide: बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न Rape Accused Commits Suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17044078-thumbnail-3x2-committedsuicide.jpg)
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल :अमोल राजू क्षीरसागर असे या आरोपीचे नाव असून आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लॉकअप गार्ड ड्युटीवरली वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत जामदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रुग्णालयातही आत्महत्येचा प्रयत्न :आरोपी क्षीरसागर याच्या विरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे नुकताच एका तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्यातील कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते. त्याने कोठडीतील भिंतीवर तसेच गजावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.ससून रुग्णालयात त्याला बंदोबस्तात उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. त्या वेळी प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी त्याने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी जामदार यांच्याकडे केली. आणि तो तेथून प्रसाधन गृहात गेला आणि प्रसाधनगृहातील खिडकीची काच गळ्यावर मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला.