पुणे - रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले आहे, याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. श्रीकांत मिनीनाथ जगदाळे (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी
5 जून रोजी एक महिला एकटीच घरात होती. यावेळी आरोपी श्रीकांत मिनीनाथ जगदाळे याने संबंधित महिलेच्या घरात येऊन तिचा विनयभंग केला. शिवाय तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबतची तक्रार संबंधित पीडितेने रांजणगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. परंतु आरोपी या घटनेनंतर फरार होता.