पुणे- शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील एका कामगाराने पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमित चव्हाण असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.
रांजणगाव एमआयडीसीतील कामगाराची पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या; थरार सीसीटीव्हीत कैद - midc
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील एका कामगाराने पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
कामगाराची पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या
अमित हा रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी टोबॅको कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करत होता. दरम्यान, रविवारी (14 जुलै) थर्ड शिफ्ट सुरू असताना त्याने कंपनीतील पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. तर अमितच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबात रांजणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रांजणगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Last Updated : Jul 15, 2019, 11:44 PM IST