पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत बाबा रामदेव यांना प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवार, अजित पवार तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा हे चित्र पाहता चांगलंच राजकारण सुरू आहे. राज्यात एक नवीन समीकरण झालं आहे. तसेच देशात देखील असंच काहीसं समीकरण पाहायला मिळत आहे. देशात 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कुणीच पराभूत करू शकणार नाही. (Ramdev Baba on Maharashtra Politics) (Ramdev Baba on Sharad Pawar) (Ramdev Baba on PM Narendra Modi) (Ramdev Baba on Ajit Pawar)
येणारा काळ हा भारताचा आहे : 'चंद्रयान 3' बाबत बाबा रामदेव म्हणाले की, ज्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणताच देश गेला नव्हता तिथं आपण पोहोचलो आहोत. आपला पराक्रम आता संपूर्ण जगानं पाहिला आहे. ही तर भारताच्या विश्व विजयाची भरारी आहे. देशात सत्तेत असणाऱ्या लोकांची नियती, नेतृत्व आणि नीती यामुळे देश पुढं जातोय. येणारा काळ हा भारताचा आहे. 2047 च्या पूर्वीच आपला देश जगातील आर्थिक आणि अध्यात्मिक महासत्तेचं केंद्र बनेल. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं नेतृत्व आणि मोदींचं नेतृत्व हे भारताला महाशक्ती बनवण्यासाठी मदत करत आहे.