पुणे - यंदाचा अर्थसंकल्प देशाला परिवर्तनाकडे घेऊन जाणार असून, सर्वांना दिलासा देणारा आहे. शेतकऱ्यांनाही अर्थसंकल्पामुळे ताकद मिळणार असून, माझ्या खात्यामध्ये (सामाजीक न्याय) मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला न्याय मिळाला असल्याचे मत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या अर्थसंकल्पावरील टीकेवर बोलताना आठवले म्हणाले, पवार साहेब विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे ते अर्थसंकल्पाच्या विरोधातच बोलणार. पवारांच्या मताशी मी सहमत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी हे बजेट वर्ष आहे ट्वेंटी-ट्वेंटी, अशी छोटीसी कविता म्हणून दाखवली. राज्य सरकारच्या काही मागण्या असेल तर आम्ही मंजूर करू. आमचे सरकार नाही म्हणून राज्यावर अन्याय करण्याची भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे मागण्या कराव्यात. त्या मागण्या मी पंतप्रधानांकडे घेऊन जाईल असेही आठवले यावेळी म्हणाले.