पुणे- मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु आरक्षणामुळे मराठा-ओबीसी समाजात वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे- रामदास आठवले - ramdas athavle news
२०२१ ची जणगणना ही जातीच्या आधारावर करावी यासंबंधी पंतप्रधान पत्र देणार असल्याचेही आठवले म्हणाले. जातीच्या आधारावर जातीवाद वाढेल या मताचा मी नाही. ग्रामीण भागात आजही दलितांवर अत्याचार होतात. मात्र, दलितांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी असल्याचेही आठवले म्हणालेे. ramdas aathavle latest news
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्यात आगोदर माझी मागणी
आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी सर्वात अगोदर मी केली होती. मी ग्रामीण भागातून आल्याने मला माहीत होते की सर्व मराठा समाजातील बांधव हे श्रीमंत नाहीत. मराठा समाजातही गरीब असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मराठा समाजातील गरीब व्यक्तींना, अल्पभूधारकांना आरक्षण मिळाले पाहिजे. या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाला पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. ही मागणी मराठा समाजाची आहे. ओबीसींना आरक्षण कमी मिळाले आहे. त्यात मराठा समाजाला टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. आरक्षणासंबंधी कायदा करायचा असेल तर एकट्या मराठा समाजला करता येणार नसल्याचेही आठवले म्हणाले.
२०२१ ची जनगणना जातीच्या आधारावर करावी
महाराष्ट्रातील मराठा, हरियाणातील जाट, राजस्थानमधील राजपूत, यूपीमधील ठाकूर, आंध्रप्रदेश येथील रेड्डी आहेत. या सर्व क्षत्रिय जातींना १० -१२ टक्के आरक्षण देण्याची मागणी माझ्या पक्षाने केली आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तसेच २०२१ ची जणगणना ही जातीच्या आधारावर करावी यासाठी पंतप्रधान पत्र देणार असल्याचेही आठवले म्हणाले. जातीच्या आधारावर जातीवाद वाढेल या मताचा मी नाही. ग्रामीण भागात आजही दलितांवर अत्याचार होतात. मात्र, दलितांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी असल्याचेही आठवले म्हणालेे.