महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही - रामदास आठवले - पुणे

काही दिवसांपूर्वी झुलवाकार जेष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती.

दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही - रामदास आठवले

By

Published : Jun 23, 2019, 8:51 PM IST

पुणे- लेखक-साहित्यिक चळवळी बळकट करण्यासाठी आपले आयुष्य लावतात. मात्र, अनेक साहित्यिकांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. काही दिवसांपूर्वी झुलवाकार जेष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती. त्यांनतर समाजातील विविध स्तरातून त्यांना मदतीचा ओघ सुरू सुरू झाला. यापुढे दलित साहित्यिकांची उपेक्षा होणार नाही, यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून 'झुलवाकर' उत्तम बंडू तुपे यांचे दुमजली घर उभे राहिले आहे. त्या घराचे हस्तांतरण रामदास आठवले यांच्या हस्ते तुपे यांच्याकडे करण्यात आले. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार विजय काळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आठवले म्हणाले, उपेक्षित, दलित माणसाचे दुःख, वेदना तुपे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांच्या हलाखीच्या जीवनाकडे सर्वांचे लक्ष उशिरा गेले. परंतु, यापुढे कोणत्याही दलित साहित्यिक विचारवंतांची उपेक्षा होऊ देणार नाही. झुलवा, काट्यावरची पोटं यासारख्या असंख्य पुस्तकातून तूपेंनी साहित्यसेवा केली आहे, अशा थोर साहित्यिकाचा मला अभिमान आहे. तसेच यापुढेही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे आठवले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details