पुणे : कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. मग तो आमदार असो वा माजी मंत्री, असे म्हणत माजी आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल ( Union State Minister Prahlad Singh Patel ) यांच्या समवेत शिंदे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ram Shinde : जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट - आमदार राम शिंदे - Ram Shinde at baramati in pune
पुणे : कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. मग तो आमदार असो वा माजी मंत्री, असे म्हणत माजी आमदार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल ( Union State Minister Prahlad Singh Patel ) यांच्या समवेत शिंदे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राम शिंदे म्हणाले की, आपल्या देशात कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाने हर हर महादेव या चित्रपटाला मान्यता दिली आहे. चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे, कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल करून अशी मारहाण होत असेल तर संबंधितांवर कारवाई होऊन अटक व्हायलाच पाहिजे. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट आल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचे समर्थन - राम शिंदे म्हणाले की, आपल्या देशात कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाने हर हर महादेव या चित्रपटाला मान्यता दिली आहे. चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे, कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल करून अशी मारहाण होत असेल तर संबंधितांवर कारवाई होऊन अटक व्हायलाच पाहिजे. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट आल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड अटकेत - हर हर महादेव सिनेमा बंद करण्यासाठी गेलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमा बंद पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये हरकत नोंदवणाऱ्या एका प्रेक्षकांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये जितेंद्र आव्हाडसह त्यांच्या दहा कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिसांनी त्यांना सुरुवातीला चौकशीला बोलावलं आणि त्यानंतर संध्याकाळी उशिराने त्यांना अटक दाखवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड हे हर हर महादेवचा शो बंद करण्यासाठी जेव्हा मॉलमध्ये गेले तेव्हा एका प्रेक्षकाने त्यांना विरोध केला. त्यानंतर शिवीगाळ झाल्यामुळे आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रेक्षकाला मारहाण केली आणि या संदर्भामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तक नगर पोलिसांनी चौकशीला बोलवून अटक केली आहे.