पुणे -आशा सेविकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झालेली असतानाही जर आशा सेविका आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्य सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्या वर आहे. अशा परिस्थिती आशा सेविका असे आंदोलन करणार नाहीत असा आहे. असे आरोग्यमंत्री टोपे पुण्यात बोलत होते.
आंदोलन करू नये -
आशा सेविकांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या कामगार युनियन प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा झालेली आहे. या बैठकीनंतर आशा सेविका यांचे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांच्या समस्याबाबत राज्य सरकारने विचार करण्याचे आश्वासन दिलेले असताना देखील आशा सेविका आंदोलन करत असतील, तर ते योग्य नाही असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले. राजेश टोपे मंगळवारी पुण्यातल्या वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आशा सेविकांच्या प्रश्न आंदोलनावर भाष्य केले. राज्यात आशा सेविका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्यभर आशा सेविकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता आंदोलन छेडले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलते होते.
मागण्यांवर विचार होईल -