पिंपरी-चिंचवड पुणेपिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. तसे आदेश राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहेत. मावळते आयुक्त राजेश पाटील यांनी अनेक योजना, उपक्रम राबवले आहेत. तर, महानगर पालिका रुग्णालयात दरवाढ केल्याने नागरिकांसह, सामाजिक कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोर जाव लागले होते.
पिंपरी चिंचवडचे महानगर पालिकेतून राजेश पाटलांची उचलबांगडी तर शेखर सिंहंची आयुक्तपदी नियुक्ती - पिंपरी चिंचवडचे महानगर पालिकेतून राजेश पाटलांची उचलबांगडी
शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर काही दिवसातच त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश पाटील यांनी तृतीयपंथी व्यक्तींना समाजात स्थान मिळावे या उद्देशाने ग्रीन मार्शल पथक, सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. तर, शहरातील पवना आणि इंद्राणी नदी ची सुरक्षा करण्याच काम देखील त्यांनी तृतीयपंथी व्यक्तींवर सोपवलं होत.
तृतीयपंथी व्यक्तींना समाजात स्थान मिळावे यासाठी प्रयत्न मावळते आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे फेब्रुवारी 2021 ला हातात घेतली होती. मात्र, अवघ्या दीड वर्षात त्यांची उचलबांगडी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार च्या काळात त्यांची बदली पिंपरी-चिंचवड आयुक्त पदी झाली. परंतु, शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर काही दिवसातच त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश पाटील यांनी तृतीयपंथी व्यक्तींना समाजात स्थान मिळावे या उद्देशाने ग्रीन मार्शल पथक, सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. तर, शहरातील पवना आणि इंद्राणी नदी ची सुरक्षा करण्याच काम देखील त्यांनी तृतीयपंथी व्यक्तींवर सोपवलं होत. आयुक्त पाटील यांच्या हस्ते शहरातील पहिला शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रमाचे उदघाटन केले. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांची बदली झाल्याच समोर आलं आहे.