पुणे- देशात असलेल्या वेगवेगळ्या जातीधर्मातील नागरिक आपापल्या प्रथेनुसार होळी हा सण साजरा करतात. राजस्थानी श्रीपाली ब्राह्मण समाजातही होळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. अनेक वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त राज्याबाहेर पडलेल्या या समाजातील नागरिकांनी गुरुवारी शहरात हा सण साजरा केला.
राजस्थानी श्रीपाली ब्राम्हण समाजाचा होळीनिमित्त 'ढुंढोत्सव' - होळी
अनेक वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त राज्याबाहेर पडलेल्या या समाजातील नागरिकांनी गुरुवारी शहरात हा सण साजरा केला.
श्रीपाली ब्राह्मण समाजात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला यावर्षी समाजात जन्मलेल्या लहान मुलांची ढुंढ म्हणजेच ढुंढोत्सव साजरा करतात. यामध्ये समाजातील सर्वच पुरुष, महिला आणि लहान मुलेही सहभागी होतात. जन्माला आलेल्या बाळाची पहिली होळी असल्यामुळे बाळाची आत्या, मावशी आणि इतर नातेवाईक त्यांच्यासाठी नवे कपडे आणतात. पुरुष मंडळी त्या बाळाची गहू, तांदूळ, ज्वारी यासारख्या ध्यानाने ओवाळणी करतात. रंग खेळून त्या बाळाचे स्वागत केले जाते. हे सर्व करण्यामागचे कारण म्हणजे बाळाला पुढील आयुष्यात कुठलाही त्रास होऊ नये. त्याच्यावर येणारी इडापिडा टळली जावी, हा उद्देश असतो.
यावेळी बाळाची आई, आज्जी, आत्या पारंपरिक गीते गात बाळाभोवती फेर धरतात तर, पुरुष मंडळीही रंगामध्ये न्हाऊन निघतात. समाजातील सर्वांसाठी या दिवशी गोडधोड जेवण केले जाते.