महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण; मात्र, जागेअभावी दुर्मिळ वस्तू नागरिकांच्या दृष्टीआड

राजा दिनकर केळकर यांनी १९२० मध्ये हे वस्तू संग्रहालय सुरू केले. त्यांनी २३ हजार दुर्मिळ वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. मात्र, याठिकाणी फक्त ११ ते १२ टक्केच वस्तू मांडण्यात आल्या आहेत. जागेअभावी पूर्ण वस्तू याठिकाणी ठेवता येत नाहीत.

raja dinkar kelkar museum pune
राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण

By

Published : Jan 11, 2020, 8:31 AM IST

पुणे -शहरातील राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राजा केळकर यांनी जतन केलेल्या २३ हजार वस्तू याठिकाणी ठेवल्या जातात. मात्र, जागेअभावी या वस्तू ठेवता येत नाहीत. त्यामुळे सरकारने ६ एकर जागाही मंजूर केली. मात्र, अद्यापही याठिकाणी म्युझियम सिटी उभारण्याचे काम मार्गी लागले नाही.

राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण

राजा दिनकर केळकर यांनी १९२० मध्ये हे वस्तू संग्रहालय सुरू केले. त्यांनी २३ हजार दुर्मिळ वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. मात्र, याठिकाणी फक्त ११ ते १२ टक्केच वस्तू मांडण्यात आल्या आहेत. जागेअभावी पूर्ण वस्तू याठिकाणी ठेवता येत नाहीत. राज्य सरकारने केळकर संग्रहालय आणि इतरही संग्रहकांच्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी पुण्यातील बावधन गावात ६ एकर जागा मंजूर केली. त्याठिकाणी म्युझियम सिटी उभारण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आता केळकर संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही या म्युझियम सिटीचे काम मार्गी लागले नाही. त्यामुळे या कामाला राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्ही मिळावा, अशी अपेक्षा राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संचालक सुधनवा रानडे यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का? - ..अखेर त्या झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!

ABOUT THE AUTHOR

...view details