पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात प्रचारसभा सुरू आहे. या सभेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार असे ते म्हणाले. पुण्यातील मंडईमध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
पुण्यातील तसेच राज्यातील पुरावर भाष्य करताना राज्यात एवढा पूर आला की, कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, अशी टीका राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला आहे.