महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेचे पुण्यात दोन दिवसीय शिबीर; मोबाईल नेण्यास पदाधिकाऱ्यांना मनाई - राज ठाकरे न्यूज

पक्ष बांधणीसह इतर विषयांवर राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी, तर शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.

mns pune
मनसेचे पुण्यात दोन दिवसीय शिबीर

By

Published : Dec 20, 2019, 1:43 PM IST

Updated : Dec 20, 2019, 2:51 PM IST

पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजपासून मनसेच्या संवाद शिबीराचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. आज (शुक्रवार) आणि उद्या मनसेचे राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासाठी हे शिबीर असणार आहे. विशेष म्हणजे या शिबीराच्या ठिकाणी येताना मनसेच्या पदाधिकाऱयांना मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा -जुन्नरचे नाव 'शिवनेरी' करावे, 'या' आमदाराने केली मागणी

पक्ष बांधणीसह इतर विषयांवर राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी, तर शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मनसेच्या शिबिराला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Last Updated : Dec 20, 2019, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details