महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray Pune visit : राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर, आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनीही तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले.

Raj Thackeray Pune visit
Raj Thackeray Pune visit

By

Published : Jun 21, 2023, 4:26 PM IST

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून राज्यभरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनीही तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले.

राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची तयारी करा. निवडणुकीची तयारी सुरू करा. राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना सर्व जागांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तत्काळ मतदार याद्यांचे काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.यावेळी नाशिकचे शेतकरीही राज ठाकरे यांची भेट घेऊन शेतीबाबत चर्चा करणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे पुण्यातील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

नाशिकच्या शेतकऱ्यांशी करणार चर्चा : आज सकाळी अकरा वाजता राज ठाकरे पक्ष कार्यालयात आल्यानंतर पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांची बैठक होणार असल्याचे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले. राज्यात अनेक शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत असून नाशिकचे शेतकरीही आज राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे वागस्कर म्हणाले.

पक्षाच्या कामकाजात बदल ? : तसेच येत्या वर्षभरात राज्यात लोकसभा, महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यातच पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यावरून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीमुळे पक्षाच्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता राज ठाकरेंनी पुण्याचा पक्ष बांधल्याचे बोलले जात आहे.

मनसे कार्यकर्त्यांची बैठक : त्याचवेळी ठाकरे यांनी आज पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहीती आहे.

हेही वाचा -Raj Thackeray Birthday : वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरेंचे कार्यकर्यांत्यांना अवाहन, मिठाई ऐवजी शैक्षणिक भेटवस्तू देण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details