महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray : हर हर महादेव चित्रपटाच्या वादासंदर्भात राज ठाकरेंनी घेतली इतिहास अभ्यासकांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी हर हर महादेव चित्रपटासंर्दभात ( Har Har Mahadev Movie ) इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे ( Raj Thackeray met Gajanan Mehdale ) यांची पुण्यामध्ये भेट घेतली.

By

Published : Nov 12, 2022, 8:46 PM IST

Updated : Nov 12, 2022, 9:49 PM IST

Raj Thackeray
Raj Thackeray

पुणे - हर हर महादेव या चित्रपटाचा ( Har Har Mahadev Movie ) वाद विकोपाला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडने चित्रपटाला विरोध केला असून बऱ्याच चित्रपटगृहामधले शो बंद पडले आहेत. तर, दुसरीकडे मनसेने हर हर महादेव शो सुरू करण्यासाठी संरक्षण दिले आहे. राज्यात या चित्रपटावरून राजकारण पेटलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची पुण्यामध्ये येऊन भेट ( Raj Thackeray met Gajanan Mehdale ) घेतली आहे.

इतिहासाबाबत दहा प्रश्न जाणून घेतले -याबाबत इतिहास अभ्यासक मेहेंदळे यांना विचारला असता. ते म्हणाले राज ठाकरे आमची भेट घेण्यासाठी आजच नाही यापूर्वीही येत होते. बाबासाहेब पुरंदरे हयात असताना ते त्यांची भेट घेतल्यानंतर माझी भेट घेत असायचे. राज ठाकरे यांना इतिहासाचा आणि शिवाजी महाराजांच्या अभ्यासाबद्दल कुतूहल आहे, म्हणून ते सातत्याने त्यांचे प्रश्न आमच्याकडून जाणून घेत असतात.आज देखील त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत दहा प्रश्न माझ्याकडून जाणून घेतले.अशी माहिती इतिहास अभयसक गजानन मेहंदळे यांनी सांगितले आहे.

इतिहासाचा विपर्यास - हर हर महादेव या चित्रपटाचा व्हॉइस-ओव्हर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन दिवसांनंतर छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केला म्हणून संताप व्यक्त केला होता.

चुकीचा इतिहास दाखवण्यात आला- "हर हर महादेव या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास मोडतोड करून, चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे." असा थेट आरोप संभाजी राजे यांनी केला होता. त्यासोबत येणारा चित्रपट वेडात मराठी वीर दौडले सात या चित्रपटांवरती देखील आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यांचे या भूमिकेनंतर राज्यात हर हर महादेव चा शो बंद करण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने घेतली होती. त्याचा विरोध करत मनसेने पुन्हा एकदा शो सुरू केला. मात्र राजकारणात हे खटके उडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याला चित्रपटाविषयी भूमिका मांडण्यास स्पष्ट मनाई केली आहे.

राज ठाकरेंनी घेतली इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळेंची भेट -योग्य वेळी मी आपलं मत व्यक्त करेन, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची भेट घेतली. म्हणून येणाऱ्या भविष्यात राज आपली भूमिका काय मांडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्यात भेट घेतल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे त्यांचे आजच्या भेटीचे प्रतिक्रिया समजू शकली नाही परंतु इतिहास अभ्यासक गजानन महिंदळे यांनी फोनवरून ही माहिती पत्रकारांना दिली आहे.

Last Updated : Nov 12, 2022, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details