पुणे- देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकारने हा सर्व प्रताप सुरू केला आहे. सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात केंद्र सरकारवर टीका केली आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची काय गरज आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा -'जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही'
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. या विरोध आंदोलनावेळी अनेक ठिकाणी हिंसा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.