पुणे :महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. हे जरी टिकवल तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादे दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. पण आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरात ला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi ) शोधत नाही. असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. आधीचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे पंजाब चे होते म्हणून त्यांनी पंजाब च पाहावं का? असा दाखला राज ठाकरे यांनी दिला आहे. (Raj Thackeray attacked Modi government ) ते पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनात ( World Marathi Conference ) बोलत होते. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.
Raj Thackeray : महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत, एखादा उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही - राज ठाकरे - राज ठाकरे
जागतिक मराठी संमेलनात ( World Marathi Conference ) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एखादे दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. ( reaction to political situation in Maharashtra ) पण, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) शोभत नाही. नुसते एकसंघ म्हणायचे, असा जोरदार टोला राज ठाकरेंनी मोदी सरकारला लगावला आहे. (Raj Thackeray attacked Modi government )
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका :महाराष्ट्रातील एक दोन उद्योग बाहेर गेले म्हणून काही फरक पडत नाही. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. ते टिकवले तरी महाराष्ट्र पुढे राहील. अस रोखठोक मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. उद्योगांवर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून पंतप्रधान मोदी हे गुजरातला प्राधान्य देतात हे त्यांना शोभणारे नाही. याअगोदर ही इतर राज्याचे पंतप्रधान झालेले आहेत. पण त्यांनी स्वतः च्या राज्याला प्राधान्य दिले नाही. केवळ एक संघ म्हणायचे हे अस असते का एकसंघ असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले की, राज्यकर्ता हा मोठ्या मनाचा असावा तो व्यापारी नसावा. तेव्हा विचारांना स्वातंत्र्य मिळते अस देखील त्यांनी अधोरेखित केले आहे. राजकारणात केवळ पैसा हे माध्यम नाही. नागरिकांची मने देखील जिंकता आली पाहिजेत. केवळ पैश्यांवर राजकारण करता येत नाही. अन्यथा मतदानाचा टक्का कमी झाला नसता. 2019 ला राज ठाकरे यांनी भाजप सरकार ला विरोध केला होता. मात्र, भाजप च्या 370 कलम आणि राम मंदिराच्या निर्णयाच स्वागत मी केले अस त्यांनी म्हटले. पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणारा मीच होतो. तेव्हा विरोधक कुठे गेले होते. आता देखील भारतातील पाकिस्तानी चित्रपटाला बंद पाडला अस राज यांनी म्हटले आहे.
मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होते :राज्यकर्ता हा मोठ्या मनाचा असावा त्याचा व्यापारी नसावा. राजकारणात पैसे हे माध्यम आहे. पण मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होते. नुसते पैसे वाटून होत नाही, तसे असते तर मतदानाचा टक्का कमी झाला नसता. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात, विविध अंगांनी कामे करता येतात. तुमच्या कामाला राजकारणाची धार नसेल तो पर्यंत सामाजिक कार्य होऊ शकत नाही. प्रत्येक मूलभूत गरजांशी राजकारण जोडलेल आहे. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का मानत आहात, असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.