महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार - पावसात भिजण्याचा आनंद

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार कायम आहे. या संततधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र ही दिसत आहे. पावसाळी वातावरणाचा अनुभव असणाऱ्या काही पुणेकर घरातून निघतानाच रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडले होते. काही पुणेकरांनी तर पावसात भिजण्याचा आनंद घेतल्याचेही चित्र दिसत होते.

raining in Pune to morning
पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार

By

Published : Jun 17, 2021, 1:52 PM IST

पुणे - पावसाने आज (गुरुवारी) सकाळपासूनच शहरात हजेरी लावत पुणेकरांना चिंब केले आहे. आज सकाळपासूनच पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार कायम आहे. तर मधेच एखादी मोठी सर हजर लावून जात आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या काही पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पुणेकरांनी पावसात भिजण्याचा घेतल्या आनंद -

या संततधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र ही दिसत आहे. पावसाळी वातावरणाचा अनुभव असणाऱ्या काही पुणेकर घरातून निघतानाच रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडले होते. काही पुणेकरांनी तर पावसात भिजण्याचा आनंद घेतल्याचेही चित्र दिसत होते.

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा -

दरम्यान मागील काही दिवसांपासून वातावरणात ओलावा आल्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.

हेही वाचा - हर्णेत अतिवृष्टी; रस्ते झाले जलमय

ABOUT THE AUTHOR

...view details