खेड (पुणे)-उत्तर पुणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुपार पासून शहरी भागात जोरदार पावसाला सुरवात झाली.
अवकाळी पाऊसाने खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर भागास झोडपले
अवकाळी पाऊसाने खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या भागास झोडपून काढले. पूर्वेकडून मार्गक्रमण करत एका तासात पावसाने आंबेगाव, खेड, शिरूर व जुन्नर तालुका व्यापला. सणसवाडीत, शिक्रापूर, पाबळ, रांजणगाव, शेलपिंपळगाव, आळंदी, चाकण, खेड, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, जुन्नर, शिरोली, ओझर, लेण्याद्री, पांगरी, कळंब, आळेफाटा आदी सर्वच भागात उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता.