पुणे : उन्हाळ्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यभर उन्हाचे चटके बसत असताना मागच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी गारपीठांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. असे असले तरी येत्या 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान देखील राज्यातील अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी पडणार पाऊस : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण व गोवा या ठिकाणी 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांच कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा या ठिकाणी देखील 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व गारपीट होण्याची शक्यता आहे. आणि विदर्भ या ठिकाणी देखील 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह विजांच कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.