पुणे- येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज - महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
पुणे शहरात सोमवारी, मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -पुण्यात सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात
पुणे शहरात सोमवारी, मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवली आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडेल, तर उत्तर भागात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच 7 तारखेला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात उत्तर भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.