पुणे- जिल्ह्यातील काही भागात बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात ऊन, वारा आणि पाऊस असे वातावरण पाहायला मिळाले. अचानक सुरू झालेल्या पावसाने डोंगराळ भागातील आदिवासी नागरिकांची तारांबळ उडाली.
भीमाशंकर मंदिर परिसरात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ - पुणे पाऊस बातमी
गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा वर गेला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत होता. मात्र, आजच्या पावसाने वातावरण थंड झाले. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. दुपारी भीमाशंकर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ऊन, वारा आणि पाऊस असा तिहेरी संगम परिसरात अनुभवायला मिळाला.
हेही वाचा-दिल्लीतील भाजीमार्केटमधील ११ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण
गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा वर गेला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत होता. मात्र, आजच्या पावसाने वातावरण थंड झाले. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. दुपारी भीमाशंकर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ऊन, वारा आणि पाऊस असा तिहेरी संगम परिसरात अनुभवायला मिळाला.
आवकाळी पाऊसाच्या सरी सह्याद्रीच्या कुशीत बरसल्याने या सरी आता पुढे सर्वत्र पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या शेतात कांदा, बाजरी, ज्वारी काढणी सुरू आहे. तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याची साठवण करण्यात शेतकरी व्यस्त असताना पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांचीही धावपळ झाली.