महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rain for the next A few days - पुढील काही दिवस राज्यात पाऊस, हवामान विभागाची माहिती - Rain for the next A few days

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस,हवामान विभागाची माहिती
पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस,हवामान विभागाची माहिती

By

Published : Nov 14, 2021, 12:51 PM IST

Updated : Nov 17, 2021, 7:36 PM IST

पुणे - राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान, पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आता बुधवारपासून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आंदमानच्या समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र (weather department information)

आता आंदमानच्या समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील 4 दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Rain for the next five days)

आज (14 नोव्हेंबर)पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने आज (शनिवार) सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता (Rain for the next five days at several places)

आज सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे. तसेच, हवामान खात्याने उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या चार दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात चारही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा -शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खान यांच्यावर बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Last Updated : Nov 17, 2021, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details