महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर छापा, राजकारण्यांपासून ते बांधकाम व्यवसायाशी निगडित कागदपत्रे सापडली - RAID ON RTI OFFICER

मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बराटे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांना राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याशी निगडित शेकडो फाईल्स सापडल्या आहेत...

RAID ON RTI OFFICER
रविंद्र बराटे

By

Published : Oct 30, 2020, 11:19 AM IST

पुणे -मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बराटे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांना राजकारणी, बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याशी निगडित शेकडो फाईल्स सापडल्या आहेत. याशिवाय कुलमुखत्यार पत्रे, खरेदीपत्र, करारनामे, भागीदारी पत्रे आणि इतर दस्तऐवजाचा समावेश आहे.

कागदपत्रे जप्त..

पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बराटे आणि त्याच्या नातेवाईकांच्या पुण्यातील सहा घरांवर एकाच वेळी छापा टाकला, परंतु तो सापडला नाही. मात्र, त्याच्या धनकवडी येथील घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली. यामध्ये माहिती अधिकारात केलेले अर्ज, माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती, पुणे आणि मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित असलेली कागदपत्रे, शासकीय ठेकेदारांशी संबंधित असलेली कागदपत्रे, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, इन्कम टॅक्स कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींशी संबंधित असलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

काय आहे प्रकरण ?

रवींद्र बराटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुधीर वसंत कर्नाटकी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. तेव्हापासून रवींद्र बराटे फरार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details