पुणे (शिरूर) -घोडगंगा साखर कारखान्याच्या बाजूस न्हावरे आलेगाव पागा रस्त्यावर एका पालामध्ये शिरूर पोलिसांनी छापा टाकून साठवणूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला ७८ किलो गांजा जप्त केला. या गांजाची किमत १६ लाख ३८ हजार आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
शिरूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ७८ किलो गांजा जप्त - पुणे पोलिसांनी ७८ किलो गांजा जप्त केला
शिरूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ७८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
![शिरूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ७८ किलो गांजा जप्त पुणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:22:10:1619517130-mh-pune-27apr-shirur-ganja-dry-10056-27042021144122-2704f-1619514682-100.jpg)
पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत न्हावरा (ता. शिरूर) गावच्या हद्दीत न्हावरा ते आलेगाव पांगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पालामध्ये गांजाची साठवणूक करून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरिक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार संतोष साठे, पोलीस नाईक मुकंद कुडेकर, अंमलदार शितल गवळी यांच्यासह नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी छापा टाकला. या छाप्यात पालामध्ये चार व्यक्ती असल्याचे आढळले. अधिक तपास केला असता दोना गोणी खाकी कागदात आणि प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेले एकूण पस्तीस पुडे मिळाले. याचा तपास केला असाता हा गांजा असल्याचे निषपन्न झाले. यानंतर मुद्देमालासह आरोपी सुनिल रूपराव पवार, आकाश सर्जेराव पवार, विशाल कैलास मोहिते, प्रकाश सर्जेराव पवार (सर्व रा. टाकरखेड, ता. विखली, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापूरे हे करत आहेत.