महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधींची यात्रा भारत जोडो नसून पुढारी जोडो यात्रा, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल - राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोलॉ

देश पातळीवर काँग्रेस पक्षाला कोणी राष्ट्रीय पक्ष म्हणून स्विकारायला तयार नाही. काँग्रेसची राज्यात कशी अवस्था झाली आहे, हे आपण माहविकास आघाडी सरकारच्या काळात पाहिले आहे. फक्त मंत्री पदासाठी सत्तेत राहायचे. त्यातून पक्ष वाढ ही झालीच नाही, अशीच अवस्था देश पातळीवर आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेने काहीही होणार नाही. फक्त पुढारी जोडी ( radhakrushn vikhe patil critics on rahul gandhi ) अशी ही यात्रा होणार आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांनी केली आहे.

Radhakrushn Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By

Published : Nov 6, 2022, 6:18 PM IST

पुणे : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातुन जाणार आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. मात्र कधीकाळी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले आत्ता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, देश पातळीवर काँग्रेस पक्षाला कोणी राष्ट्रीय पक्ष म्हणून स्विकारायला तयार नाही. काँग्रेसची राज्यात कशी अवस्था झाली आहे, हे आपण माहविकास आघाडी सरकारच्या काळात पाहिले आहे. फक्त मंत्री पदासाठी सत्तेत राहायचे. त्यातून पक्ष वाढ ही झालीच नाही, अशीच अवस्था देश पातळीवर आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेने काहीही होणार नाही. फक्त पुढारी जोडी ( radhakrushn vikhe patil critics on rahul gandhi ) अशी ही यात्रा होणार आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल


यात्रा काढून देश जोडता येत नाही - राज्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रात काही परिणाम होणार नाही. फार फार तर पुढारी जोडो होऊ शकतात. राहुल गांधींना मी मागेच सल्ला दिलेला आहे की, काँग्रेस छोडो जो कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याकडे आधी लक्ष द्या. वेगवेगळ्या योजनेतून देशभरातून माणूस कसा जोडला जातो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलेला आहे. फक्त यात्रा काढून भारत जोडला जात नाही, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी लगावला आहे. पुण्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज महानंद दूध संदर्भात बैठक, तसेच बैलगाडा शर्यतीबाबत देखील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

कारवाईबाबत काय म्हणाले - यावेळी दुय्यम नियाबंधकांवर कारवाई बाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हे माझ्या पदभार स्विकारण्याच्या आधी झाले आहे. पण मी याची माहिती घेणार आहे. निलंबित झालेल्या लोकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. हे जे प्रकार घडत आहे, यातून भ्रष्टाचार वाढत आहे. बाकी काहीही होत नाही असे यावेळी मंत्री पाटील म्हणाले.


प्रताप सरनाईकांविषयी प्रतिक्रिया व्यक्त - प्रताप सरनाईक यांच्या ईडीच्या चौकशीबाबत विखे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की चौकशी आणि शिंदे गटात सामील होण्याचा काही संबंध नाही. प्रताप सरनाईक यांनी त्याबाबत स्वतः अनेकदा खुलासा केलेला आहे. त्यामुळे ते शिंदे गटात यावे म्हणून ईडीची कारवाई झाली किंवा आरोप झाले ही काही वस्तुस्थिती नाही आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीचा आणि इकडे येण्याचा काही संबंध नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.


जयंत पाटील यांना काम नसल्याची केली टीका - भाजपच्या महासंकल्प अभियानाची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर आल्याबद्दल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादा पक्षाचे मुखपत्र आहे म्हणून जाहिरात द्यायची नाही, असे काही नाही आमचे सरकार अगदी खुल्या मनाने काम करत आहे त्याचे हे उदाहरण आहे. तसेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोक्याचे प्रश्न बंद दराआडच सोडले जावेत अशी खोचक टीका केली होती. याला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिला आहे.ते म्हणाले की रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या मतभेदांच्या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतलेली आहे. त्यानंतर दोघांनाही जाहीरपणे वाद मिटल्याचे सांगितलं होते. मात्र जयंत पाटील यांच्याकडे काही काम राहिलेले नाही, त्यामुळे हे चालू आहे. तसंही राष्ट्रवादी काँग्रेसची ख्यातीच आहे, खोटे बोला पण रेटून बोला, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.


महानंदाची परिस्थिती बिकट - महानंदाची परिस्थिती बिकट झाली असून एकेकाळी 9 लाख लिटर दुधाचे संकलन असणाऱ्या महानंदाकडे आज 30 ते 40 हजार लिटर दुधाचे संकलन आहे. त्यामुळे तेथील कामगारांचे प्रश्न एरणीवर आहेत. त्यामुळे एनडीडीबीने हे महानंदा चालवायला घ्यावे, असा एका प्रस्ताव सद्या आला आहे. सर्व सभासदांशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांची महत्त्वाची मागणी होती, वेळेवर पेमेंट दिलं पाहिजे त्यासाठी राज्यसरकारकडून तत्काळ दहा कोटी रुपये आपण दिले आहेत. महानंदाने अनावश्यक खर्च टाळून बंद पडलेले सेवा सुरू करण्याबाबत विचार करावा, असे देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांना श्रेय - बैलगाडा शयतीची अंतिम सुनावणी येत्या 23 तारखेला आहे. त्याबाबत विखे पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यात राज्यसरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. तसेच आत्ता जे बैलगाडी शर्यत होणार आहे त्यात लंपिच्या आजाराचे प्रादुर्भाव कमी होत चालले आहे. त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच बैलगाडाला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच बैलगाडा शर्यती सुरू करण्याचे खरे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि आमदार महेश लांडगे यांना द्यावे लागेल, असे देखील यावेळी विखे पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details