पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आणि राज्यातील अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्या प्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगरमध्ये देखील स्थानिक नागरिकांनी मतदानचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी हुतात्मा राजगुरू विद्यालयातील मतदान केंद्रात आकर्षक सजावटीच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याबाबतची विशेष माहिती घेतली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी..
कौतुकास्पद उपक्रम : मतदारांच्या स्वागतासाठी राजगुरूनगरकरांनी सजवले मतदान केंद्र - VOTERS
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राजगुरूनगरकरांनी सजवले मतदान केंद्र... आकर्षक सजावटीच्या माध्यमातून दिला मतदानाचा संदेश... तरुण मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी सेल्फी पाँईंटचीही केला तयार
आपल्या देशातील लोकशाहीमध्ये मतदान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हेच कर्तव्य बजावत असताना राजगुरू नगरमधील मतदान केंद्रांमध्ये केलेली सजावट मात्र मतदारांना आश्चर्यचकीत करून टाकणारी आहे. एवढेच नाही तर या ठिकाणी मतदानाला येणाऱ्या वृद्ध, अपंग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मतदान केंद्रावर आकर्षक सजावटीचे एक प्रवेशद्वार उभे करण्यात आले आहे. रंगबेरंगी छत्र्या लावण्यात आल्या आहेत. याचबरोबर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे मन प्रसंन्न करणारी सुंदर रांगोळी रेखाटून स्वागतही करण्यात आले आहे. तसेच उन्हाच्या कडाक्यामध्ये तरुण, वयोवृद्ध मतदारराजा असे नागरिक या ठिकाणी मतदानाला येऊन मतदान करत असताना...! मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो, आपले मत आपली ताकत.. "देश आपला आपण देशाचे सिद्ध करू सज्ञान असल्याचे" असे विविध संदेश या ठिकाणी देण्यात आले आहे. तसेच येथे येणाऱ्या मतदारांसाठी आकर्षक असा सेल्फी पाँईंटही तयार करण्यात आला आहे.