महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर शांतपणे विचार करून द्यावे - निंभोरकर

पुलवामा इथे झालेल्या दहशवादी हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे.

pulwama

By

Published : Feb 16, 2019, 5:36 PM IST

पुणे - पुलवामा इथे झालेल्या दहशवादी हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे. मात्र, हा बदला कधी आणि कसा घ्यायचा याचा शांततेत विचार झाला पाहिजे, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले आहे.

pulwama

२०१६ मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये निंभोरकरांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पुलवामा हल्ल्यामध्ये तथील स्थानिकांसह पाकिस्तानचा हात असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचा हल्ला हा स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. यामध्ये नक्कीच स्थानिकांचा सहभाग आहे. या हल्ल्यात इंटेलिजन्सचे अपयश म्हणता येणार नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आज विशेष संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details