महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काम अपूर्ण असलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन? - काम सुरु असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन

पुणे येथील जंबो कोविड सेंटरचे 22 तारखेला या उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दोन दिवसात हे सुसज्ज हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. अद्याप या कोविड सेंटरमध्ये काम सुरु असून काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्याचा घाट का घालण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.

Pune covid center
पुणे कोविड सेंटर

By

Published : Aug 26, 2020, 10:57 PM IST

पुणे-येथीलबहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे काम पूर्ण न झालेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याची घाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी का केली असा प्रश्न विचारला जातोय.

काम सुरु असलेल्या कोविड सेंटरचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन?

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने दोन जम्बो कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. त्यातील एक पुण्यात तर दुसरे पिंपरी चिंचवड शहरात आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये 800 बेडची व्यवस्था होणार आहे. यामध्ये 600 बेड ऑक्सिजन तर 200 बेड व्हेंटिलेटर युक्त असणार आहेत.

पुण्यातील कोविड केअर सेंटरच्या कामाची सुरुवातीची डेडलाईन 19 ऑगस्ट होती. परंतु, पावसाचे कारण देत डेडलाईन पुढे ढकलण्यात आली होती. 22 तारखेला या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दोन दिवसात हे सुसज्ज हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, आज देखील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचा पत्ता नसल्याचे दिसून आले.

कोविड केअर सेंटर मध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मोठ्या संख्येने कामगार आत मध्ये काम करताना दिसत आहेत. बेड लावले जात आहेत. दरवाजे लावले जात आहेत. अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू, धुळीचे साम्राज्य पाहता अजून पुढचे काही दिवसही येथील काम पूर्ण होईल, असे दिसत नाही. त्यामुळे काम पूर्ण झालेले नसतानाही प्रशासनाने या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याचा घाट का घातला, असा प्रश्न उपस्थित होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details