पुणे - पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प, भवानी पेठ, नाना पेठेला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती. तसे पत्र कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी १५ एप्रिलला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले होते.
पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये क्वारन्टाईनची सोय - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती
आझम कॅम्पसमधील प्रार्थना स्थळाची सर्व सुविधांसह दुमजली जागाही देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने ठेवली होती. येथे आलेल्या रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची, पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते.

डॉ. पी. ए. इनामदार, अध्यक्ष, आझम कॅम्पस, पुणे
डॉ. पी. ए. इनामदार, अध्यक्ष, आझम कॅम्पस, पुणे
आझम कॅम्पसमधील प्रार्थना स्थळाची सर्व सुविधांसह दुमजली जागाही देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने ठेवली होती. येथे आलेल्या रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची, पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही इमारत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहे तर ही इमारत दुरुस्ती आणि साफ़ सफाई करून आज प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली.