Michael Vaughan Reaction On Purandar's Umpire : पुरंदरच्या क्रिकेट अंपायरची इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही घेतली दखल - क्रिकेट पंच डी एन रॉय
क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जात. हे वाक्य खेळाडूंसह आता क्रिकेटच्या पंचांनाही (Cricket umpires) लागू होत आहे. पुरंदरच्या अशाच एका पंचाची (Purander's Cricket Umpire) करामत पाहून त्याला थेट आयसीसीच्या पंच पॅनलमध्ये (ICC Umpire Panel) सहभागी करावं अशी खुमासदार प्रतिक्रिया थेट इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली आहे.
पुणे -न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेट पंच बिली बाऊडेन (New Zealand's famous cricket umpire Billy Bowden) यांचे सामन्यातील इशारे जागतिक क्रिकेटमध्ये (World Cricket) चांगलेच प्रसिद्ध आहेत. सभ्य गृहस्थांच्या खेळात पंचांच्या पारंपरिक इशाऱ्यांना मागे टाकत बाऊडेन यांनी आपली एक खास शैली प्रसिद्ध केली. त्याच बाऊडेन यांचा भारतीय अवतार पुरंदरमध्ये (Purandar) एका स्थानिक स्पर्धेतील सामन्यातच पाहायला मिळाला. गोलंदाजानी टाकलेल्या वाइड चेंडूवर कॉल देताना या पंचाने चक्क शीर्षासन करत, दोन्ही पाय बाजूला घेत वाइडचा इशारा केला. या पंचामुळे टेनिस चेंडूवर खेळली जात असलेली ही स्पर्धाही चांगलीच लोकप्रिय होत आहे.