पुणे -अतिवेगवान प्रवासाचे भविष्यातील साधन म्हणून 'हायपरलूप'कडे पाहिले जाते. हायपरलूप प्रकल्पाला चालना मिळण्याच्या दिशेने अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हायपरलूपच्या दोन यशस्वी मानवी चाचण्या अमेरिकेत घेण्यात आल्या. या मानवी चाचण्यांमध्ये दोन व्यक्तींनी हायपरलूपच्या पॉडमधून प्रवास केला. यात अभिमानाची बाब म्हणजे, हायपरलूपमधून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील तनय मांजरेकर होते. तनय मांजरेकर हे पुणेकर आहेत. हायपरलूपच्या चाचणीत मांजरेकर यांचा सहभाग सर्वांनाच सुखद धक्का देणारा ठरला.
पुण्याच्या तनय मांजरेकरला हायपरलूपमधून प्रवासाची संधी अमेरिकेच्या 'लास वेगास' येथील केंद्रावर 'व्हर्जिन हायपरलूप'च्या वतीने 'हाय स्पीड पॉड सिस्टीम'ची पहिली यशस्वी मानवी चाचणी रविवारी घेण्यात आली. तर, दुसरी चाचणी सोमवारी घेण्यात आली आणि त्यात तनय मांजरेकर यांचा समावेश होता. तनय मांजरेकर हे व्हर्जिन हायपरलूपचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ आहेत. हायपरलूपवर काम करणे आणि यातून प्रथम प्रवास करणाऱ्यांपैकी एक असणे, हे माझ्यासाठी स्वप्नच प्रत्यक्षात आल्यासारखे आहे, अशा भावना तनय मांजरेकर यांनी व्यक्त केल्या. तनय मांजरेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची पदवी प्राप्त केली आहे. ते 2016पासून 'व्हर्जिन हायपरलूप'मध्ये काम करत आहेत.
'हायपरलूप' प्रकल्पांची यशस्वी चाचणी अमेरिकेचे एक महत्वपूर्ण पाऊल आतापर्यंत चारशे मानवविरहित चाचण्या -
'व्हर्जिन हायपरलूप'च्या आजपर्यंत जवळपास चारशे मानवविरहित चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे या पहिल्याच मानवी चाचणीकडे जगाचे लक्ष होते. पहिल्या मानवी चाचणीत हायपरलुपचे टेक्नॉलॉजी अधिकारी जोश गेगल आणि संचालक सारा लुशियन यांनी प्रवास केला. तर दुसऱ्या मानवी चाचणीत तनय मांजरेकरसह हायपरलूपच्या इतर अधिकाऱ्यांना प्रवास करण्याची संधी मिळाली. दोन्ही यशस्वी चाचण्यानंतर हायपरलूपच्या क्षमतेबरोबरच सुरक्षिततेबाबत शिक्कामोर्तब झाले, अशी प्रतिक्रिया व्हर्जिन हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे वॅल्डर यांनी दिली. तसेच चाचणीसाठी वापरण्यात आलेले वाहन 2 प्रवासी क्षमतेचे होते. तर व्यावसायिक स्वरुपात बनवण्यात येणारे वाहन आकाराने मोठे आणि 28 आसन क्षमतेचे असणार आहे.
पुण्याच्या तनय मांजरेकरला हायपरलूपमधून प्रवासाची संधी महाराष्ट्रात हायपरलूपला परवानगी -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. हायपरलूप-डीपी वर्ल्ड कन्सोर्शिअम यांना ओरिजिनल प्रोजेक्ट प्रपोनंट (ओपीपी) म्हणून मान्यता दिली आहे. पुणे-मुंबई या दोन महानगरांना हायपरलूप (हवा विरहित पोकळी) तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. पुणे-मुंबई ‘हायपरलूप’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतला आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
हायपरलूपमधून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील तनय मांजरेकर अमेरिकेत ‘हायपरलूप’ची पहिली मानवी चाचणी यशस्वी हेही वाचा -मुंबई-पुणे प्रवास होणार २३ मिनिटात; हायपरलूप प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता