महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणेकरांसाठी खुशखबर..! 22 ऑगस्टपासून पीएमपीएमएल बस सेवा सुरु होण्याची शक्यता

नागरिकांच्या सोयीसाठी आणि गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली बस सेवा पुन्हा हळूहळू पूर्णपदावर यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या 22 तारखेपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएलची बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

पुणे पीएमपीएमएल बस सेवा
पुणे पीएमपीएमएल बस सेवा

By

Published : Aug 16, 2020, 4:25 PM IST

पुणे - कोरोनामुुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा येत्या 22 तारखेपासून म्हणजेच गणेश चतुर्थीला पुन्हा ‘श्री गणेशा' होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पावर यांच्याकडे पीएमपीएमएल प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी तत्त्वताः मान्यता दिली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी सुरवातीला 25 टक्के पीएमपीएमएल सुरु करण्यात येणार आहे.

नागरिकांचा जसा प्रतिसाद वाढेल तसा पीएमपीएमएलच्या बसेसमध्ये वाढ करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमपीचे संचालक नगरसेवक शंकर पवार यांनी दिली.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएलची बस सेवा ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्यात आली होती. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आणि पुणे शहरात पुन्हा लोक रस्त्यावर येऊ लागले.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली बस सेवा पुन्हा हळूहळू पूर्णपदावर यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या 22 तारखेपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएलची बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details