पुणे - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन आपापल्यापरीने प्रयत्न करत आहे. मात्र, पुण्यात या आठवड्याभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्तच वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच भवानी पेठेत कोरोनाचा जास्तच प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाच्या या लढ्यात पुणे शहर कोरोनामुक्त करण्यासाठी 'कोरोना योद्धा' म्हणून पुणेकरांनी पुढे यावे आणि प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अगरवाल यांनी केले आहे.
"शहर कोरोनामुक्त करण्यासाठी 'कोरोना योद्धा' म्हणून पुणेकरांनी पुढे यावे" - pune covid 19
पुणे शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालय 'रेड झोन' घोषित करण्यात आले आहे. या पाचही क्षेत्रीय कार्यालयामध्ये 100 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. या भागात प्रशासनाकडून एक विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे.
पुणे शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालय 'रेड झोन' घोषित करण्यात आले आहे. या पाचही क्षेत्रीय कार्यालयामध्ये 100 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. या भागात प्रशासनाकडून एक विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे. कोरोना मुक्त पुणे या मोहीमेअंतर्गत पुणे महापालिका आणि जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी कोरोना योद्ध्यांची गरज आहे. जास्तीत जास्त डॉक्टरांची गरज आहे. लोकांनी पुढे येऊन या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही रुबल अगरवाल यांनी केले.