पुणे -कोरोना विषाणूमुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे चिकनबद्दल प्रचार करण्यासाठी शहरात चिकन फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
चिकन फेस्टीव्हलला पुणेकरांची गर्दी, एक किलोमीटरपेक्षा मोठी रांग - pune latest news
कोरोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आपल्यालाही कोरोना विषाणूचा संसर्ग होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे सोडले होते. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणामही आता पाहायला मिळत आहेत.

चिकन फेस्टीव्हलमधील चिकन बिर्याणी आणि चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. जवळपास एक किलोमीटरपेक्षा मोठी रांग लागली होती. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून या फेस्टीव्हलचे आयोजन केले जात आहे. तसेच चिकनचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी या फेस्टीव्हलचे आयोजन करत असल्याचे आयोजक नितीन वैद्य यांनी सांगितले. मात्र, या गर्दीवरून चिकनमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, अशी भीती नागरिकांच्या मनात नसल्याचे दिसून येत आहे.