पुणे - रजत सचिन राठी या विद्यार्थ्याने सीए फाउंडेशनच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत त्याने 400 पैकी 350 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून झाल्यानंतर त्याने वाणिज्य शाखा निवडली होती. तरीही त्यांने देशात प्रथम क्रमांक मिळवला.
कौतुकास्पद.! सीएच्या परीक्षेत पुण्यातील रजत राठी देशात पहिला - पुणे बातमी
विज्ञान शाखेत असतानाच काकांनी माझ्यातील क्षमता ओळखून मला सीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे सुचविले. त्यानुसार मी प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
रजत पुण्यातील सहकारनगर परिसरात राहतो. रजतची आई गृहिणी तर वडील एका मेडिकलच्या दुकानात कामाला आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या रजतने फर्ग्युसन महाविद्यालयातून अकरावी आणि बारावी सायन्समधून केली. नंतर त्याची वाणिज्य शाखेतील रुची पाहून त्याच्या काकांनी त्याला सीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे सुचविले. त्यानंतर त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले.
विज्ञान शाखेत असतानाच काकांनी माझ्यातील क्षमता ओळखून मला सीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे सुचविले. त्यानुसार मी प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. मी कधीच अभ्यासाचा ताण घेतला नाही. जसा वेळ मिळाला तसा अभ्यास केला. आई-वडिलांनी माझ्यावर कधीच अभ्यास करण्यासाठी दबाव टाकला नाही. दररोज दोन-चार तास अभ्यास केला आणि हे यश मिळाले, असे आपल्या यशाबद्दल बोलताना रजतने सांगितले.