Pune ZP meeting : पुणे जिल्ह्यात नामांतराचे वारे.. मळवली रेल्वे स्टेशनला एकवीरा आणि वेल्हा तालुक्याला राजगड नावाला मंजुरी - मळवली रेल्वे स्टेशनचे एकवीरा नामकरण
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
पुणे -पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड (Velha taluka as Rajgad) करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे (Malvi railway station as Ekvira) नाव देण्यात यावे, अशा आशयाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव (Velha taluka as Rajgad ) उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमताने पाठिंबा दिला. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर केला. मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे (Malvi railway station as Ekvira) नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठरावही करण्यात आला आहे.