पुणे - भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतातील ही लोकशाही जिल्हा परिषद शाळेतील अनोख्या उपक्रमामुळे आणखी खोलवर रुजणार आहे. मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचा व राज्याचा कारभार चालवतात अगदी त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद शाळांमध्ये कारभार चालणार आहे. विद्यार्थ्यांचे मतदान घेऊन वर्गात मंत्रिमंडळ तयार करुन वर्गाचा कारभार चालवला जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळेत बच्चे कंपनीचं सरकार...! मंत्रिमंडळ स्थापन करुन वर्गाचं चालणार कामं - pune news'
जिल्हा परिषद शाळा पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांना विविध उपक्रमातून मुलांचा सर्वांगीन विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अशा उपक्रमांमधुन मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील टाकळकरवाडी शाळेत आज चिमुकल्या मुलांच्या मंत्रिमंडळाची निवडणूक मतदान प्रक्रियेतून पार पडली. मतदानावेळी वर्गशिक्षक प्रगती बनकर यांनी निवडणूक आधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, क्रिडा मंत्री, शिक्षण मंत्री असे विविध खातेनिहाय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांना विविध उपक्रमातून मुलांचा सर्वांगीन विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येत आहे. मुलांनी आपली स्वत:ची जबाबदारी घेत संपूर्ण वर्गाचा कारभार चालविण्याचा प्रयत्न करावा, असे शिक्षिका प्रगती बनकर यांनी सांगितले.