पुणे- हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तिच्या मृत्यूमुळे समाजमन हेलावले असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी आता जोर धरत आहे. हैदराबाद एनकाऊंटर पॅटर्न महाराष्ट्रात अमलात आणावा, अशी संतप्त भावना पुण्यातील तरुणींमधून उमटत आहे.
हिंगणघाट जळीतकांड: पुण्यातील तरुणींच्या संतप्त प्रतिक्रिया हेही वाचा - एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा करा - नवनीत राणा
यापुढे मेणबत्या जाळणार नसून आम्ही जिजाऊंच्या लेकी अशा घटनांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही पुण्यातील तरुणींनी दिला. मंत्र्यांनी फक्त बोलून तोंडाच्या वाफा करण्यापेक्षा कार्यवाही काय करावी त्याकडे पाहावे, अशी टीका या तरुणींनी केली.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : सोमवारी सकाळीच पेट्रोल हल्ला अन् मृत्यूही सोमवारीच
'या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना नकार पचवता येत नाही, त्यामुळे अशा हिंसक घटना समाजात घडत आहे. अशा घटना टाळण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे,' अशी प्रतिक्रिया तरुणींनी दिली. या शिवाय पेट्रोल, अॅसिडच्या सहज उपलब्धतेवर बंदी घालायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.