महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abhijit Katke Won Hind Kesari : हिंद केसरीचा किताब पटकाविल्याने अभिजीत कटकेचे कुटुंबीय आनंदात, पहा काय म्हणाले? - अभिजीत कटकेचे कुटुंबीय

हैदराबादमध्ये (Abhijit Katke won Hind Kesari) अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ स्पर्धा पार (All India 51st Hind Kesari Wrestling Tournament) पडली. या स्पर्धेत पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने हिंदकेसरी किताब पटकावला (Hind Kesari Wrestling at Hyderabad) आहे. त्याच्या या विजयानंतर मिठाई वाटप करून घरच्यांनी जल्लोष साजरा (Abhijit katke family celebration) केला.

Abhijit Katke Won Hind Kesari
हिंद केसरी अभिजीत कटके

By

Published : Jan 9, 2023, 11:25 AM IST

कुस्तीपटू अभिजित कटकेने हिंद केसरीचा पटकावला किताब

पुणे :पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला (All India 51st Hind Kesari Wrestling Tournament) आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केलेली होती. या स्पर्धेत फायनलमध्ये हरियाणा सोमविर विरुद्ध अभिजीत कटके हा सामना झाला. या सामन्यात कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला (Abhijit Katke won Hind Kesari) आहे.



आनंद उत्सव साजरा :अभिजीत कटके याने हिंद केसरी हा किताब पटकावल्यानंतर तिच्या घरच्यांनी घराबाहेर फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला आहे. यावेळी अभिजीत कटकेच्या आई म्हणाल्या (Mother of Abhijit Katke) की, तो 17 वर्ष झाले माझ्यापासून लांब झाला आहे. आज तो हिंद केसरी झाला (Abhijit katke family celebration) आहे. याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. आम्ही जे स्वप्न राहील होते, ते त्याने पूर्ण केले आहे. तो आला की, आम्ही त्याचे जंगी स्वागत करणार आहोत. त्याला आवडीचे सर्व पदार्थ खाऊ घालणार असल्याचे यावेळी त्याच्या घरच्यांनी सांगितले (Hind Kesari Wrestling at Hyderabad) आहे. अभिजित कटके यांच्या घरी अतिशय आनंदाचे वातावरण आहे. अभिजीतच्या यशामुळे प्रयत्नांचे सार्थक झाले, अशा कटकेंच्या आई म्हणाल्या.



एक परिपक्व पैलवान :अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान (wrestler Abhijit Katke won title of Hind Kesari) आहे. अभिजीतचे वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अभिजीतने 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला (wrestler Abhijit Katke) होता. 2016 साली त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचे दिसून येत आहे. 2017 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता, तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळाले होते. आत्ता त्याने हिंद केसरी हा किताब देखील पटकावला (Hind Kesari Wrestling Tournament 2023) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details