पुणे -पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायची योजना आखली होती. मात्र याचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. ही घटना पुण्यातील वारजे माळवाडी येथे घडली. विशेष म्हणजे दोघेही आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. या प्रकरणी पत्नी व तिचा प्रियकर यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रवी व सोनल (नावे बदलली आहेत) यांचा विवाह मार्च महिन्यात झाला आहे. रवी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तर सोनल ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. सोनलचे विवाहापूर्वीपासून विवेक बरोबर प्रेमसंबंध होते. विवाहानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचे नाही, असे ठरवले होते. मात्र ते दोघेही एकाच कंपनीत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा जुळले.
विवेक हा नेहमी त्यांच्या राहत्या घराबाहेर फेऱ्या मारताना रवीला दिसत होता. पत्नी सोनलने महाबळेश्वरला जायचे नियोजन केल्यावर दोघेही महाबळेश्वरला गेले होते. तिथेही विवेक हा रवीला त्यांच्या अवती-भोवती फिरताना दिसत होता. यामुळे रवीला त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला होता.