महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Water Supply to Pune : पुण्यातील पाणी कपातीचा निर्णय रद्द; 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी मिळणार - खडकवास धरण

पुणे शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आषाढी वारी,( Ashadi Wari ) बकरी ईद ( Eid festivals ) सणांमुळे 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी मिळणार आहे.

Pune Municipal Corporation
पुणे महापालिका

By

Published : Jul 10, 2022, 4:15 PM IST

पुणे:शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द ( water cut decision canceled ) करण्याचा निर्णय महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आषाढी वारी ( Ashadi Wari ) आणि बकरी ईद ( Eid festivals ) या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत पाणीकपात (water cut) न करता पूर्ववत पाणीपुरवठा (water supply) करण्यात येणार आहे. दरम्यान, मान्सून सक्रीय झाल्याने धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. त्यातच पाणीकपात ११ जुलै पर्यंतच असल्याने पाणीकपात जवळपास रद्द करण्यात आल्याचे संकेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार दिवसाआ़ड पाणीपुरवठा (water supply) करण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (४ जुलै) पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलैपर्यंत होणार होती. या कालावधीत पडणारा पाऊस तसेच धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पाणी वितरण व्यवस्थेचे पुढील नियोजन करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्यापूर्वीच पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

पावसाने दिलेली ओढ, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण (Khadakwasla dam) साखळीत कमी झालेला पाणीसाठा, यामुळे पुणेकरांना एक दिवसा आड पाणी देण्याचा निर्णय महानगर पालिका घेतला होता . त्यामुळं त्यापुणेकरांना पाण्याची चिंता होती. गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७० मि.मी, पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ३.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १२.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत ३.३५ टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी ०.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :Bakri Eid Special : पुण्याच्या लक्ष्मी बाजारात रॅम्बो बकऱ्याची चर्चा...पहा पुण्यातील रॅम्बो बकरा

ABOUT THE AUTHOR

...view details